फडणवीसांसोबत माझं बोलणं झालंय, तुम्ही जिम सुरू करा; राज ठाकरे मैदानात

मुंबई | पहिल्या लॉकडाऊनपासून सध्या व्यायामशाळा बंद आहेत. आता मागे केंद्र सरकारनेही जिम सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र राज्य सरकारने अजूनही परवानगी न दिल्याने संतापलेल्या जिम चालक-मालक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली. यावेळी राज ठाकरे जिम चालक आणि मालकांसाठी सरकारविरोधात मैदानात उतरले आहेत.

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशीही माझं बोलणं झालं. त्यांचंही म्हणणं आहे की जिम चालू करायला हव्यात. आता मी सांगतोय तुम्ही करी चालूज्याला यायचं आहे, तो जिमला येईल. बघू काय होतं, असं राज ठाकरे यांनी भेटायला आलेल्या जिम मालकांना- चालकांना सांगितलं.

किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या, असं आवाहन राज यांनी केलं आहे.

दरम्यान, जिम चालकांंचं मोठ्या प्रमाणात भाडं थकलं आहे. काहींनी कर्ज काढून जिममधील मशीन्स आणल्या होत्या. मात्र आता जिमच बंद असल्याने जिमच बंद करण्याची वेळ काहींवर आली. परंतू आता राज ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे जिम चालू केल्यावर प्रशासन कारवाई करतं की नाही? किंवा राज्य सरकार आता जिम चालू करण्यासाठी परवानगी देत की नाही? हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, महाराज ही फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही त्यांनी नाक खुपसण्याची गरज नाही

मेंदूतील गाठीच्या शस्त्रक्रियेसाठी गेलेले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह

‘एका तासातच मोदींना ठार करेन’; चक्क मोदींना जीवे मारण्याची धमकी!

राज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा अधिकार नाही- युजीसी

“जे सरकार शिवरायांचा द्वेष करतं ते हिंदुत्ववादी कसं?, भाजपची नकली शिवभक्ती काय कामाची”