…त्यासाठी मी मोदी सरकारला पूर्ण पाठिंबा द्यायला तयार आहे; राज यांचं मोठं वक्तव्य

मुंबई |  राज ठाकरे यांनी आपल्या आजच्या महाअधिवेशनाच्या भाषणातून मनसेची पुढील वाटचाल स्पष्ट केलीये. हिंदुत्व हा माझा DNA आहे, असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रावर आणि देशावर प्रेम करणाऱ्या मुलमानांना आमचा विरोध नाही, असं म्हटलं तर दुसरीकडे बांगलादेशातून आणि पाकिस्तातून आलेल्या मुसलमानांना पहिल्यांदा हाकला. केंद्र सरकारने जर हे पाऊल उचललं तर आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल, असं राज ठाकरे म्हणाले.

बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या 9 फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्चांना उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढून देणार असल्याचंही राज ठाकरे यांनी जाहीर केलं.

आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे, असंही राज म्हणाले.

सीएए एनआरसीवर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम 370 असो वा राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे. नरेंद्र मोदी जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम 370 असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो, अशी आठवण करून देत त्यांनी भाजपसोबत जाण्याचे संकेत देखील दिले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-