‘सौ दाऊद एक राऊत’, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका

मुंबई | एकनाथ शिंदे व समर्थक आमदारांच्या बंडाळीनंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. तब्बल 10 दिवसांच्या सत्तानाट्यानंतर महाराष्ट्रात शिंदे सरकार स्थापन झालं.

शिंदे सरकास सत्तेत आल्यानंतरही शिवसेना खासदार संजय राऊत व शिंदे गटातील शाब्दिक युद्ध सुरूच आहे. शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊतांविरोधात नाराजीचा सूर आवळला असून आमदार राऊतांवर सडकून टीका करत आहेत.

शिंदे गटातील आमदारांनी संजय राऊतांना लक्ष केलं असून आता मनसेने देखील राऊतांवर निशाणा साधला आहे. मनसेचे गजानन काळे यांनी ट्विट करत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

ठाणे महानगरपालिकेतील 67 पैकी 66 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले, यावरून गजाजन काळे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. तर सौ दाऊद एक राऊत, अशी बोचरी टीका देखील गजानन काळे यांनी केली.

चमत्कार बाबा संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला, असा टोला गजानन काळे यांनी लगावला आहे. राहिलेल्या नगरसेवकाला महापौर करणार बहुतेक राऊत, असंही गजानन काळे म्हणाले.

दरम्यान, ठाण्यापाठोपाठ नवी मुंंबईत देखील शिवसेनेला मोठा खिंडार पडण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील 30 ते 32 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याने उद्धव ठाकरेंचं टेंशन वाढलं आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील खिंडार

… अन् देवेंद्र फडणवीसांनी हात धरून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ

नासकी भाजी म्हणत गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले…

“कारवाई करायला काँग्रेस पक्षात माणसं तरी किती शिल्‍लक राहिली आहेत?”

मोठी बातमी! महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला झटका