खळबळजनक! सुशांत सिंह राजपूत प्रकरणी चर्चेत आलेल्या ‘या’ व्यक्तिला जीवे मारण्याची धमकी

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली. सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणात अनेक ट्विस्ट आलेले पाहायला मिळाले.

सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली अशा चर्चा रंगत असताना या प्रकरणात अनेक नावं समोर आली. सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी ते त्याची मैत्रिण रिया चक्रवती, अशी अनेक नावं सुशांतच्य मृत्यूनंतर चर्चेत आली.

सुशांतची पूर्व मॅनेजर दिशा सालियन व सुशांतच्या मृत्यूचा देखील संबंध जोडला जात होता. मात्र, या सगळ्यात चित्रपट निर्माता व सुशांतचा मित्र संदीप सिंग याची सर्वात जास्त चर्चा झाली.

संदीप सिंग याला फेसबुकद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर संदीप सिंग याने मुंबई पोलिसांकडे धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली आहे.

संदीपला 4 जुलैरोजी ही धमकी देण्यात आली होती. पंजाबी सिंगर सिद्धू मूसावाला सारखंच तुझीची हत्या केली जाईल, अशी धमकी संदीप सिंगला देण्यात आली होती.

संदीप सिंगने अंधेरीतील अंबोली पोलीस ठाण्यात धमकी देणाऱ्या अनोळखी व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. तर पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत सायबर टीमला तात्काळ कामाला लावलं आहे.

दरम्यान, संदीप सिंगने ‘सरबजीत’, ‘पीएम नरेंद्र मोदी’, ‘झुंड’ यासारख्या बॉलिवूड चित्रपटांची निर्मिती केली आहे. तर संदीप सध्या माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट बनवण्याच्या तयारीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘सौ दाऊद एक राऊत’, मनसेची संजय राऊतांवर खोचक टीका

शिवसेनेला आणखी एक धक्का! ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईत देखील खिंडार

… अन् देवेंद्र फडणवीसांनी हात धरून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं, पाहा व्हिडीओ

नासकी भाजी म्हणत गुलाबराव पाटलांची संजय राऊतांवर खोचक टीका, म्हणाले…

“कारवाई करायला काँग्रेस पक्षात माणसं तरी किती शिल्‍लक राहिली आहेत?”