डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्यावर मनसेचा आक्षेप

मुंबई |  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 आणि 25 फेब्रु. रोजी भारत दौऱ्यावर येत आहे. व्हाईट हाऊसने तशी माहिती ट्वीट करून दिली आहे. या भारत दौऱ्यावेळी ते अहमदाबादला जाणार आहे. मात्र यावरच मनसेने तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद ! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे (संदर्भ: इंडियन एक्सप्रेस) “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. “केम छो?”.. “केम छो” का?, असा सवाल मनसे नेते अनिल शिदोरे यांनी उपस्थित केला आहे.

“गुजरात का?” ह्यावर व्हाईट हाऊस च्या प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे की गुजरात मोदींचं राज्य आहे आणि गांधीच्या जीवनावर गुजरातनी मोठा परिणाम केला म्हणून ट्रम्प गुजरातला जाणार आहेत.. मोदींचं राज्य हे समजलं पण गांधीही फक्त गुजरातचे? मग गांधीजी साबरमती आश्रम असताना सेवाग्रामला का आले?, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

मनसेच्या या आक्षेपावर आता भाजप काय उत्तर देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारचा दिल्लीकरांना दणका; निकालानंतर गॅस 144 रूपयांनी वाढला!

-दिल्लीत शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त!

-“अरे कशाला करताय बंगल्यांची दुरूस्ती… डागडुजी होण्याअगोदरच तुमचं सरकार पडणार”

-भाजप ही राष्ट्रीय आपत्ती म्हणणाऱ्या पवारांना ट्वीट करून भाजपचा खडा सवाल!

-रितेश-जेनेलिया घेणार ‘व्हॅलेंटाईनदिनी ‘या’ प्रसिध्द राजकारणी जोडीची मुलाखत