निवडणुकीला कुणाला मतदान करायचं?; हे सांगणारे मुल्ला-मौलवी कुठे आहेत?- राज ठाकरे

मुंबई | निवडणुकीच्या वेळी कुणाला मतदान करायचं? हे सांगत फिरणारे मुल्ला-मौलवी आता कुठे गेले? आता यावेळी त्यांना लोकांना घरात बसा असं सांगता येत नाही? या लोकांना आतूनच पाठिंबा असतो. संशय निर्माण करणारी परिस्थिती आज मुस्लीम समाज निर्माण करतोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

देशात कोरोनाचं संकट असताना अशाप्रकारे कार्यक्रम करणं योग्य नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील घडामोडींवर भाष्य केलं.

मुल्ला-मौलवी उद्या जर सरकारने किंवा कुठल्या पक्षाने भूमिका घेतली नंतर दोष द्यायचा नाही, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खडसावून सांगितलं.

दरम्यान, नोटांना आणि भाज्यांना थूंकी लावणं, नर्सेससमोर नग्न फिरणं, लोकांच्या अंगावर थुकणं असेप्रकार हे करत आहेत. या लोकांना फोडून काढण्याचे व्हिडीओ बाहेर निघायला पाहिजेत तर लोकांना काहीतरी विश्वास बसेल, असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-‘देशात सध्या लॉकडाऊन पण नंतर आम्ही आहोतच’; राज ठाकरे यांचा विकृतांना इशारा

-“मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे”

-देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली

-या लोकांना देशापेक्षा ‘धर्म’ मोठा वाटत असेल, तर यांना जगवायचं कशाला?- राज ठाकरे

-मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!