‘देशात सध्या लॉकडाऊन पण नंतर आम्ही आहोतच’; राज ठाकरे यांचा विकृतांना इशारा

मुंबई |   राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत कोरोनाची सद्यस्थिती, लॉकडाऊन, तबलिकी जात यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि नर्स यांच्यावर हल्ला करणाऱ्यांचा जोरदार समाचार घेतला. देशात सध्या लॉकडाऊन आहे पण नंतर आम्ही आहोतच, असा इशारा देत लॉकडाऊला गांभीर्याने घ्या, असं आवाहन त्यांनी केलं.

कोरोनाच्या एवढ्या मोठ्या संकटात देखील देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि काही कारस्थान करून जर कुणाला देश संपवायचा असेल. नोटांना थुंकी लावतात, भाज्यांना थुंकी लावत आहेत. नर्सेससमोर नग्न फिरत आहेत. लोकांच्या अंगावर थुकतात. या लोकांना फोडून काढा अन त्यांचे व्हिडीओ बाहेर व्हायरल करा, अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

निवडणुकावेळी अमुक तमुक पक्षाला मतदान करा, असं आवाहन करणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे? त्यांनी समजवायला नको का मुस्लिम समाजाल. नुसतं सुशिक्षित असून चालत नाही. सुज्ञ असायला हवं, असं ते म्हणाले.

मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? अशा लोकांना जगवायचं तरी कशासाठी? असं राज म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

-“मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे”

-देश म्हणून आपण चाललोय कुठे??; राज ठाकरेंची तोफ पुन्हा मोदींविरोधात धडाडली

-या लोकांना देशापेक्षा ‘धर्म’ मोठा वाटत असेल, तर यांना जगवायचं कशाला?- राज ठाकरे

-मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!

-नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….