मोदी सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

मुंबई | कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कांदा निर्यातीस असलेली बंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

कांदा निर्यातीस बंदी असल्याने राज्यात कांद्याचे दर कोसळले होते. बाजारात नवा कांदा येत असताना दर कोसळल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला रोष देखील व्यक्त केला होता.

शेतकऱ्यांनी कांदा निर्यातबंदी उठवण्याची मागणी लावून धरली होती. अखेर शेतकऱ्यांच्या या मागणीला यश आलं आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

निर्यातबंदी उठवण्याची अधिसूचना निघाली असली तरी प्रत्यक्ष निर्यात 15 मार्चपासून सुरु होणार आहे. या अधिसूचनेतील महत्वाची बाब म्हणजे पतपत्र व किमान निर्यातमूल्याची अट घालण्यात आलेली नाही. आता राज्यातील बाजार समित्यांवर शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर देण्याची जबाबदारी असणार आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-नियुक्त्या रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा धडका सुरूच; ‘या बड्या’ नेत्याची नियुक्ती रद्द

-अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले….

-….म्हणून अजित पवारांना भर सभागृहात मागावी लागली माफी!

-हे सरकार मुख्यमंत्री चालवतात की ‘सरकारी बाबू’; छत्रपती संभाजीराजे भडकले

-महाविकास आघाडीचा दणका; या निवडणुकीत भाजपचे सगळे उमेदवार पराभूत