मलाही संसार आहे लेकांनो… व्हीडिओ काढताना जरा विचार करा- इंदुरीकर महाराज

अहमदनगर | मागील काही दिवसांपासून प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकरच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकीकडे तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांना जेरीस आणलंय तर दुसरीकडे अंनिस महाराजांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या मागणीसाठी आक्रमक आहे. अशा सगळ्या वातावरणात इंदुरीकर महाराजांचं कीर्तन नगरमधल्या कोपरगावमध्ये पार पडलं. यावेळी महाराज उग्वीग्न झालेले पाहायला मिळाले.

कीर्तन सुरू होण्याच्या अगोदर त्यांनी समोरील कॅमेरे बंद करायला सांगितले. कॅमेरेवाले ऐकत नाही हे लक्षात ऐताच त्यांनी जोपर्यंत कॅमेरे बंद करणार नाही तोपर्यंत मी कीर्तन सुरू करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर देखील काही बहादरांनी गुपचूप मोबाईलचे कॅमेरे सुरू केले. महाराजांच्या ही बाब लक्षात आल्यावर मात्र ते भावनिक झाले. तुम्हाला जसे संसार आहेत तसा मलाही संसार आहे. त्यामुळे व्हीडिओ काढताना या गोष्टी लक्षात असू द्या, असं महाराज म्हणाले.

पुढे बोलताना महाराज आणखीनच भावनिक झाले. मी तुम्हाला 25 वर्ष हसवण्याचं काम केलं. पण आता मात्र माझ्यावरच रडण्याची वेळ आली आहे. एखादा माणूस पुढे जातोय तर काही लोकं त्याला संपवायलाच टपून असतात, असं म्हणत महाराजांनी आपल्या विरोधकांवर निशाणा साधला.

दरम्यान, आज अंनिसने महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ जिल्हा शल्य चिकित्सकांकडे जमा केला आहे. त्यामुळे महाराजांच्या अडचणीमध्ये वाढ झाल्याचं बोललं जातंय. आता जिल्हा शल्य चिकित्सक काय पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मोदी सरकारने कांद्यावरची निर्यातबंदी उठवली; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण

-नियुक्त्या रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा धडका सुरूच; ‘या बड्या’ नेत्याची नियुक्ती रद्द

-अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले….

-….म्हणून अजित पवारांना भर सभागृहात मागावी लागली माफी!

-हे सरकार मुख्यमंत्री चालवतात की ‘सरकारी बाबू’; छत्रपती संभाजीराजे भडकले