मोदी सरकारचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली | मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करत होते. परंतु केंद्र सरकारनं राज्यसभेत यावर स्पष्टीकरण दिलं आहे

सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि महागाई दिलासा(Dearness Relief) यात वाढ करत सुधारणा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

केंद्रीय श्रम मंत्रालयाने जारी केलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI-IW) नुसार, महागाईच्या आधारावर DA आणि DR मध्ये वाढ केली जाईल. गेल्या दोन तिमाहीत महागाईचा दर 5 टक्क्यांहून अधिक असल्याचंही सरकारने संसदेत सांगितलं.

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीच्या दरात सुधारणा करण्याची गरज नाही, असं त्यांनी राज्यसभेत सांगितलं आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता दिला जातो. होळीपूर्वी त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली असती तर एकूण महागाई भत्ता 34 टक्क्यांवर गेला असता.

सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी आणि 56 लाखांहून अधिक पेन्शनधारकांना फायदा झाला असता.

महत्त्वाच्या बातम्या- 

सोनिया गांधींकडून डॅमेज कंट्रोल; उचललं हे मोठं पाऊल 

31 मार्चच्या आत करा ‘ही’ कामे, अन्यथा बसू शकतो मोठा आर्थिक फटका 

जो बायडन यांचा रशियाला झटका; केली ‘ही’ मोठी घोषणा 

मोठी बातमी! अजित पवारांकडून आमदारांना होळीचं मोठं गिफ्ट; घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय 

Mr. IPL इस बॅक! ‘या’ नव्या इनिंगसह आयपीएलमध्ये रैनाची दमदार एन्ट्री