24व्या आठवड्यातही गर्भपात करता येणार; मोदी सरकारचा मो़ठा निर्णय

नवी दिल्ली | महिलांना यापूर्वी गर्भपातासाठी असलेली 20 आठवड्यांची मर्यादा 24 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे देशातील माता मृत्यूदर कमी होण्यासही मदत होणार असल्याचं बोललं जात आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने आज सुधारीत मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेंसी कायदा 1971 मध्ये सुधारणा केली जाणार आहे. हे नवं विधेयक येत्या संसदेच्या अधिवेशनात मांडलं जाणार आहे. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.

20 आठवड्यात गर्भपात केल्यानंतर आईच्या जीवाला धोका निर्माण होऊन मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे 24व्या आठवड्यात गर्भपात करणं महिलांसाठी सुरक्षित राहिल, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गर्भपातासाठी 24 आठड्यांपर्यंत मुदत वाढवण्यात मुदत वाढवण्यात आल्याने बलात्कार पीडित महिला आणि अल्पवयीन मुलींना यामुळे मोठा दिलासा मिळेल, असंही जावडेकर यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

-सीएएविरोधात प्रस्ताव आणण्याचा कोणताही विचार नाही- अजित पवार

-धक्कादायक… स्वारगेटजवळच्या नाल्यात सापडलं अर्भक!

-इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा दाबला – जितेंद्र आव्हाड

-कुणीही असो गरज पडल्यास चौकशीला बोलावू; चौकशी आयोगाचा फडणवीसांना दणका

-सरपंच निवडीसंदर्भातला ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!