कोरोनासोबतची आपली लढाई संपली नसून आता खरी सुरुवात झाली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार देशभरात नागरिकांनी दिवसभर घरात राहून जनता कर्फ्यु पाळला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनता कर्फ्युचं आवाहन केलं होतं. त्यास, नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

मोदींच्या आवाहनानुसार देशातील कोरोना संकटाच्या काळात आपलं योगदान देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

सायंकाळी 5 वाजता नागरिकांनी घराबाहेर येऊन थाळी वाजवून, घंटनाद करत देशातील डॉक्टर्स आणि पोलिसांप्रति आदर व्यक्त केला. देशावासियांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल आणि कृतज्ञतेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन देशवासियांची आभार मानले आहेत.

दरम्यान, कोरोनासोबतची आपली लढाई संपली नसून आता खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरकिांनी घराबाहेर पडू नये. राज्य आणि केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असंही मोदींनी म्हटलं.

 

 

 

महत्वाच्या बातम्या – 

-महाराष्ट्र लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय काय होणार??

-“सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हाच कोरोना नियंत्रणातील यशाचा मंत्र आहे”

-जनता कर्फ्यू सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवला गरज पडल्यास 31 मार्चपर्यंत वाढवणार!

-VVIP उपचारांसाठी कनिका कपूर घालतेय डाॅक्टरांशी हुज्जत

-देशात ‘कोरोना’चा सहावा बळी; पाटणामध्ये एकाचा मृत्यू