महाराष्ट्र लॉकडाऊन म्हणजे नेमकं काय काय होणार??

मुंबई |  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. 63 वरून आकडा थेट 74 वर पोहचला आहे. यावरून कोरोनाची भीषणता किती वाढली आहे, हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र लॉकडाऊन करणं खूप गरजेचं होतं. ही मागणी देखील सातत्याने होत होती. तीच मागणी आणि कोरोनाची वाढती भीषणता लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लॉकडाऊनची घोषणा केली आहे. (Cm Uddhav Thackeray Announced Maharashtra Lockdown) यामधून त्यांनी अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत.

कोरोना विषाणूचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ नये यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नागरी भागात कलम 144 लागू करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवांची वगळता सर्व दुकाने, ऑफिसेस बंद राहणार आहे. आज रात्री 12 वाजल्यापासून 31 मार्चपर्यंत हे लॉकडाऊन असणार आहे. (Cm Uddhav Thackeray Announced Maharashtra Lockdown)

आपण पाहूया महाराष्ट्र लॉकडाऊन म्हणजे काय??-

  • 5 लोकं किंवा 5 पेक्षा अधिक लोकांना सोबत फिरण्यास बंदी
  • रेल्वे, लोकल तसंच खासजी व सरकारी बससेवा बंद
  • अत्यावश्यक कारणांसाठी शहरातील बस सुरू
  • अन्नधान्य, औषधं आणि भाजीपाला दुकानं सुरू
  • बँका तसंच वित्तीय संस्था सुरू राहणार
  • केवळ पाच टक्के कर्मचारी कामावर
  • जगातून भारतात येणाऱ्या सर्व प्रकारच्या विमानांवर बंदी
  • प्रार्थनास्थळांवर पूजा सुरू मात्र भाविकांना बंदी

दुसरीकडे एवढं सगळं करूनही कोरोना विषाणू आटोक्यात आला नाही तर 31 मार्चनंतरही पुढे लॉकडाऊन तसाच ठेवण्याचा विचार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-“सार्वजनिक ठिकाणी एकमेकांपासून अंतर ठेवणं हाच कोरोना नियंत्रणातील यशाचा मंत्र आहे”

-जनता कर्फ्यू सकाळी 5 वाजेपर्यंत वाढवला गरज पडल्यास 31 मार्चपर्यंत वाढवणार!

-VVIP उपचारांसाठी कनिका कपूर घालतेय डाॅक्टरांशी हुज्जत

-देशात ‘कोरोना’चा सहावा बळी; पाटणामध्ये एकाचा मृत्यू

-जनता कर्फ्यूच्या दिवशी राजू शेट्टींनी काय केल? पहा व्हिडीओ