संघ ही राजकीय संघटना नाही आणि राजकारणाशी संघाचा काहीही संबंध नाही- मोहन भागवत

नवी दिल्ली | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, असं म्हणत मोहन भागवत यांनी भाजपचा रिमोट संघाच्या हाती नसल्याचं सांगितलं आहे.

संघ ही राजकीय संघटना नाही आणि राजकारणाशी संघाचा काहीही संबंध नाही. देशातील नैतिक, सांस्कृतीक, मानवी मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी काम करणारी ती एक संघटना आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित लोक संघात आहेत आणि त्यापैकी काहीजण राजकारणात एवढंच, असं मोहन भागवत यांनी सांगितलं आहे.

उच्च कोटीचे कित्येक बुद्धिवंत आणि समाज सुधारक हे संघाशी औपचारिकपणे जोडलेले नाहीत. पण त्यांची आणि आमची विचारसरणी एकच आहे, असंही भागवतांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एखादी विचारसरणी सर्वदूर सर्वमान्य होण्यासाठी सत्तेचेही महत्व आहे, असंही मोहन भागवत यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मेगा भरतीमुळेच भाजपचं सरकार गेलं; एकनाथ खडसेंचा भाजपला घरचा आहेर

“…अन् दादा म्हणाले पोरींनो फोटोचं राहूद्या काही अडचणी असतीलं तर सांगा”

“सावरकरांच्या भारतरत्नला विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या कोठडीत पाठवा”

अरे येड्या…लवकर गेलास; लक्ष्याच्या आठवणीत अशोकमामा भावूक

त्यावेळी मलाही बेळगाव पोलिसांनी मारहाण केली- शरद पवार