उद्धव ठाकरेंबाबत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | शिंदे गटाच्या लोकसभेच्या गटनेतेपदी खासदार राहुल शेवाळे (Rahul Shevale) यांची निवड करण्यात आलीये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी दिल्लीत 12 खासदारांसोबत पत्रकार परिषद घेतली.

पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंनी विविध विषयांवर भाष्य केलं. राहुल शेवाळे यांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

भाजपसोबत युती करण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणं झालं होतं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती, असं राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर ठाकरे आणि मोदी या दोघांत स्वतंत्रपणे चर्चा झाली होती. त्या वेळी ठाकरे यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्याचं सूतोवाच केलं होतं, असंही शेवाळेंनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांचे 20 जून रोजी बंड झाल्यानंतर ठाकरे यांनी बोलविलेल्या बैठकीतही अनेक खासदारांनी भाजपसोबत जाण्याचा विचार बोलून दाखवला होता. तेव्हाही ठाकरे यांनी तयारी दाखवली होती. मात्र संजय राऊत आणि विनायक राऊत यांनी त्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली, असं त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदे गटाकडून झाली मोठी चूक; लोकसभा सचिवालयाने दिला महत्त्वाचा सल्ला 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर  

“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही” 

दिल्लीत एक घडामोड, उद्धव ठाकरेंना मोठा झटका, फक्त एवढेच खासदार उरणार?