“प्रलोभनाला आम्ही कुत्र्यासारखे टांग वर करून दाखवतो अन् दबावाला…”

नवी दिल्ली | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 12 खासदारांसह दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे आणि खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिवसेनेचे खासदार बाळासाहेबांच्या विचारामुळे नाही तर ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच प्रलोभनाला आम्ही कुत्र्यासारखे टांग वर करून दाखवतो अन् दबावाला आम्ही झुगारून लावतो. वाईट काळात आम्ही पक्षासोबत आहोत, आमची निष्ठा पक्षासोबत आहे, असं संजय राऊत म्हणाले.

शिंदेंनी केलेल्या टीकेलाही राऊतांनी यावेळी उत्तर दिलं. मॅटिनी शो आमचाच आहे. तसेच मॅटिनी शोच काय तर पूर्ण सिनेमाच आमता आहे, असं उत्तर राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलं आहे.

मुख्यमंत्री मॅटिनीशोचं बोलत आहेत. पण दिवार आणि शोले हा मॅटनी शोला 25 वर्षे चालला आहे.  आणि मराठी अस्मितेचा मराठी सिनेमा हा मॅटनी शोलाच चालतो, असं ते म्हणालेत.

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद खोलीत जी चर्चा झाली त्यातला बराचसा भाग त्यांनी आम्हाला सांगितला. नरेंद्र मोदी आणि ठाकरे कुटुंबात जे संबंध आहेत ते राजकीय नाहीयत. बाळासाहेब ठाकरे यांच्याकाळापासून संबंध आहेत. त्यांनी मोदींना ताकद आणि पाठिंबा दिला. त्यामुळे दोघांमध्ये सतत बोलणं असायचं, असं राऊत म्हणालेत.

राजकारणात कितीही उलथापालथ झाली तरी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील एक नातं कायम राहिले. जे कुणी गौप्यस्फोट करत आहेत. त्यांना मोदींनी सांगितलं असेल, असं राऊत म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

उद्धव ठाकरेंबाबत खासदार राहुल शेवाळेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट! 

शिंदे गटाकडून झाली मोठी चूक; लोकसभा सचिवालयाने दिला महत्त्वाचा सल्ला 

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज; महत्त्वाची माहिती आली समोर  

“उद्धव ठाकरेंचं शरद पवारांवरील प्रेम पाहून झोप लागत नाही, जेवण जात नाही” 

दिल्लीत एक घडामोड, उद्धव ठाकरेंना मोठा झटका, फक्त एवढेच खासदार उरणार?