मी बिकाऊ नाही; भाजपच्या ‘या’ महिला खासदाराचं पंतप्रधानांना ट्वीट

कोलकाता : भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आणि अभिनेत्री रूपा गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जीला कोलकत्ता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मद्यपान करुन कार चालवताना झालेल्या दुर्घटनेप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अपघात आणि कारवाईनंतर खासदार रुपा गांगुली यांनी पंतप्रधान मोदींना टॅग करुन ट्विट केलं. माझं माझ्या मुलावर प्रेम आहे. मी त्याची काळजी घेईन, पण कायद्यानुसार सर्व प्रक्रिया व्हावी. ना मी चुकीचं करते, ना मी चुकीचं सहन करते. मी बिकाऊ नाही, असं ट्विट करत रूपा यांनी नरेंद्र मोदींना टॅग केलं आहे.

गुरुवारी रात्री नशेत असलेल्या आकाश मुखर्जीची कार दक्षिण कोलकात्यातील एका क्लबच्या भिंतीवर जाऊन आदळली. या अपघातात कारचं नुकसान झालं आहे. स्थानिकांनी आकाश नशेत असल्याचा आरोप केला आहे.

कार सुसाट होती, ती भिंतीवर आदळल्याने सुदैवाने या दुर्घटनेत अनेकांचा जीव वाचल्याचाही दावा स्थानिकांनी केला. अपघातात आकाशला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातानंतर जादवपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.  

पाहणीनंतर पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. आकाशची वैद्यकीय चाचणी करुन तो नशेत होता की नाही हे पाहिलं जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

दरम्यान, माझ्या मुलाचा माझ्या घराजवळचं अपघात झाला. मी पोलिसांना फोन करून कायद्यानुसार काळजी घेण्यास सांगितलं आहे. कोणताही पक्षपातीपणा किंवा कोणतंही राजकारण करू नये, असं रूपा गांगुली यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अरुण जेटलींची प्रकृती गंभीर; राष्ट्रपती घेणार भेट

-“भाजपचा फक्त जम्मू काश्मीरच्या जमिनीवर डोळा”

-तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचाय मला; नाना पाटेकरांची पूरग्रस्तांना मदत

-कलम 370 रद्द झाल्यावर भाजपला ‘अच्छे दिन’; सदस्यांची संख्या झपाट्यानं वाढली

-भारताचं मालिका विजयाचं लक्ष; आज तिसरी अंतिम लढत