राष्ट्रवादीच्या पडझडीची मला चिंता वाटत नाही- सुप्रिया सुळे

सोलापूर |  राष्ट्रवादीतून भाजप आणि शिवसेनेत होणाऱ्या पक्षांतराची आपण अजिबात काळजी करत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्या सोलापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘संवाद ताईंशी’ या खास कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

राष्ट्रवादी सोडून जी लोकं चालली आहेत आणि जाताना जी कारणे देऊन चालली आहेत ती मला योग्य वाटतं नाहीत. ईडी, सीबीआय, कारखाने, बँका याची भिती सत्ताधारी दाखवत आहेत. म्हणूनच आमची लोक आम्हाला सोडून जात आहेत. त्याचमुळे आम्ही चिंता करत नाही, असं सुळे म्हणाल्या आहेत.

राज्यात पुन्हा भाजप शिवसेनेची सत्ता आली तरी पुन्हा आमचेच लोक मंत्रिमंडळात असतील, असा खोचक टोला त्यांनी भाजप-शिवसेनेला लगावला. 

यश आणि अपयश याच्यात अडकणारी मी कार्यकर्ती नाहीये. सत्ता असली म्हणजेच सगळं चांगलं असं नाही. जर सत्ता असूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतील… मंदी येत असेल? तर सत्तेचा काय उपयोग? असंही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-