मी इतक्या दूरवर आहे आणि माझा मित्र अरुण मला सोडून गेलाय; पंतप्रधान मोदी हळहळले

नवी दिल्ली | माझ्या मनात मोठं दुःख आहे. मी इतक्या दूरवर आहे आणि माझा मित्र अरुण मला सोडून गेलाय. खूप कठीण प्रसंग आहे. एकीकडे मी कर्तव्यांनी बांधलो गेलो आहे आणि दुसरीकडे भावनांनी…, अशा शब्दांत दिवंगत अरूण जेटलींप्रती पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बहरीनमध्ये स्थायिक असलेल्या भारतीयांना संबोधित करताना माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अरुण जेटली यांचं निधन झालंय यावर विश्वास बसत नाहीय. यापूर्वी बहीण सुषमा स्वराज सोडून गेल्या आणि आता सोबत असणारा मित्रदेखील गेला. मी बहरीनमधून अरुण जेटली यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. या दु:खद प्रसंगात ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो ही प्रार्थना करतो, असं मोदी म्हणालेत. 

अरुण जेटली यांचे पुत्र रोहन यांनी पंतप्रधान मोदींना त्यांचा परदेश दौरा रद्द न करण्याची विनंती फोनवरून केली असल्याचं समजतंय. अरुण जेटलींचं निधन झाल्याचं समजताच पंतप्रधान मोदींनी ट्विटरद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहली.

महत्वाच्या बातम्या-