३० हजारांपेक्षा कमी वेतन असणाऱ्यांसाठी मुकेश अंबानींच्या रिलायन्सची मोठी घोषणा

नवी दिल्ली | देशभरात कोरोनानं धुडगूस घातला असताना रिलायन्सनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला निर्णय घेतला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ३०००० रुपयांपेक्षा कमी पगार आहे, अशा कर्मचाऱ्यांना प्रत्येक १५ दिवसांनी पगार मिळणार आहे. लाईव्ह मिंटनं अशा आशयाचं वृत्त प्रकाशित केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच संपूर्ण देशात २१ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. अशा पार्श्वभूमीवर रिलायन्सनं हा निर्णय घेतला आहे.

रिलायन्सच्या ज्या कर्मचाऱ्यांना दरमहा ३०००० पेक्षा कमी वेतन आहे, त्यांना महिन्यातून दोनदा पगार मिळणार आहे. म्हणजेच ३० हजारपेक्षा कमी पगार असलेल्या व्यक्तींना निम्मा पगार १५ तारखेला आणि निम्मा पगार महिन्याच्या शेवटी मिळेल.

कमी पगार असणाऱ्यांना सध्याच्या संचारबंदीच्या दिवसांमध्ये आर्थिक गरज भासू शकते. त्यापार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांकडे पुरेसे पैसे असावेत या उद्देशाने रिलायन्सनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या रिलायन्स जिओ नेटवर्कसाठी काम करणारे कर्मचारी वगळता इतर सर्वांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला, आणखी 5 जणांना लागण

आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

-सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

-पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

-“मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेला धन्यवाद द्यायला आलोय”