IPL 2022: मुंबई इंडियन्सचा ‘हा’ स्टार खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता

मुंबई | जगातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणून आयपीएल नावारूपास आली आहे. आयपीएलचा 2022 चा (IPL 2022) हंगाम अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अशात सर्वांची नजर अवघ्या काही दिवसांमध्ये होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावावर आहे.

जगातील क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश देशातील खेळाडू या आयपीएल ऑक्शनमध्ये भाग घेत आहेत. अशात आता जुन्या संघांनी रिलीज केलेल्या खेळाडूंवर देखील सर्वांच्या नजरा आहेत.

गतवर्षीच्या आयपीएल हंगामात आठ संघ होते. यावर्षी दोन नव्या संघाची भर पडली आहे. लखनऊ आणि अहमदाबादच्या समावेशानं नवीन खेळाडूंसाठी अधिक सक्षम संधी उपलब्ध झाली आहे.

आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सला ओळखण्यात येतं. अनेक युवा खेळाडूंच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर मुंबईनं मातब्बर संघाना धुळ चारली आहे. मात्र बीसीसीआयच्या खेळाडूंच्या लिलावाच्या नियमानं हा संघ आता अडचणीत आणलं आहे.

मुंबई संघानं आपला यशस्वी कर्णधार रोहित शर्मासह चार खेळाडूंना रिटर्न केलं आहे. परिणामी अनेक संघांना आपल्या ताफ्यात मुंबईनं रिलीज केलेले युवा खेळाडू घेण्याची संधी आली आहे.

एबी डिव्हीलीयर्सच्या निवृत्तीनं आणि क्विंटन डी काॅकच्या जाण्यानं आरसीबीला धाकड खेळाडूंची गरज आहे. परिणामी आरसीबी मुंबईचा माजी सलामीवीर यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनला आपल्या ताफ्यात घेऊ शकते.

ईशान आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आक्रमक खेळासोबतच चाणाक्ष यष्टीरक्षक म्हणून देखील ईशान खेळत आला आहे. मुंबईच्या विजयामध्ये ईशानचा मोलाचा वाटा राहिलेला आहे.

विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर आरसीबीसाठी नवीन कर्णधार म्हणून ईशान किशन चांगली भूमिका बजावण्याची शक्यता आहे. परिणामी येत्या ऑक्शनमध्ये ईशानवर सर्व संघांची नजर असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 रिपोर्टिंंग करणाऱ्या महिलेसमोर चाचानं केलं असं काही की…; पाहा व्हायरल व्हिडीओ

 एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंना मोठा झटका, ‘वयाच्या सतराव्या वर्षी…’

वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता… 

“वहिनीसाहेब जर भाऊ तुम्हाला आवरत नसेल तर तुम्हीच स्वतःला आवरा अन्यथा….”