धक्कादायक! मुंबईत ‘या’ बड्या अभिनेत्रीवर चाकूने ह.ल्ला

मुंबई |  चित्रपट सृष्टीसाठी 2020 हे वर्ष अतिशय धक्कादायक ठरलं आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी या वर्षात चित्रपट सृष्टीचा निरोप घेतला आहे. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर चित्रपट सृष्टीची पडद्याआड लपलेली काळी बाजू हळूहळू समोर येवू लागली आहे. चित्रपट सृष्टीतून रोज एक ना अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत.

अशातच आता चित्रपट सृष्टीतून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. योगेशकुमार महिपाल सिंग या आरो.पीनं अभिनेत्री मालवी मल्होत्रा हिच्यावर मुंबईत चाकूनं ह.ल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेत्री मालवी मल्होत्रावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत.

योगेशकुमार महिपाल सिंग हा मालवीवर एकतर्फी प्रेम करत होता. योगेशकुमारने अनेकवेळा मालवीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, मालवीनं त्याला नकार दिला होता. मालवीनं लग्नाला नकार दिल्याचा राग योगेशकुमारच्या मनात होता. याच रागातून योगेशकुमारनं तिच्यावर ह.ल्ला केला आहे.

आरोपी योगेशकुमार महिपाल सिंग याने फेसबुकवरून मालवीशी संपर्क साधला होता. योगेशकुमार मालविला नेहमी तो निर्माता असल्याचं सांगत होता. कामाच्या बहाण्यानं योगेशकुमार चार ते पाच वेळा मालविला प्रत्यक्ष भेटला होता.

काही दिवस लोटल्यानंतर योगेशकुमारनं मालविला प्रपोज केलं. तसेच तिला लग्नाची मागणी देखील घातली. तो नेहमी मालविला लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. मात्र, तिचा लग्नासाठी ठाम नकार होता. अनेकवेळा योगेशनं मालवीचा पाठलाग देखील केला.

मालवी काही दिवसांपूर्वी कामानिम्मित दुबईला गेली होती. ती दोनच दिवसांपूर्वी मुंबईत परत आली होती. तेव्हा देखील योगेशकुमार तिच्या बिल्डींगखालीच होता. सोमवारी रात्री अंधेरीतील वर्सोवा भागात योगेशकुमार ऑडी कारमधून आला आणि त्यानं मालवीवर चाकूने ह.ल्ला केला.

या ह.ल्ल्यात मालविला गंभीर दुखापत झाली आहे. मालवीच्या मनगटावर, बोटावर आणि पोटात ईजा झाली आहे. मालविला तातडीनं रुग्णालयात हलवल्यानं सध्या तिची प्रकृती चांगली आहे. तिची प्रकृती सुदैवाने धो.क्याच्या बाहेर आली आहे.

दरम्यान, मालवी मल्होत्रानं अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच मालवीनं अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केलं आहे. 29 वर्षीय मालवीनं नेहमीच आपल्या अभिनयातून चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अन् शेवट भाजप असा राजकीय प्रवास करणाऱ्या ‘या’ माजी आमदाराचं नि.धन

पुण्यातील लाॅजवर पोलिसांनी टाकला छापा, आत सुरु असलेला प्रकार पाहून पोलीसही हैराण!

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच सोन्याला उतरती कळा, विचार करणार नाही इतकं स्वस्त!

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…