कडक सॅल्यूट… भीषण अग्नीतांडवात स्वत:चा जीव धोक्यात घालून त्यानं तिरंगा वाचवला!

मुंबई |  मुंबईतील माझगावमध्ये असलेल्या जीएसटी भवनाला आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. इमारतीच्या आठव्या मजल्यावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. मात्र यावेळी सर्वांना अभिमान वाटावा अशी घटना घडली आहे.

जीएसटी भवनाला आग लागली असताना शिपाई कुणाल जाधव यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून 9 व्या मजल्यावरील तिरंगा सुरक्षित उतरवला. जाधव यांच्या या कृतीमुळे त्याचं कौतुक होत आहे. जीवाची पर्वा न करता जाधव यांनी तिरंगा सन्मानपूर्वक खाली उतरवला आहे.

कुणाल जाधव हे गेल्या 16 वर्षांपासून जीएसटी भवनात काम करतात. भवनाला आग लागल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान दाखवत 9वा मजला गाठला आणि ध्वज सन्मानपूर्वक उतरवला. देशप्रेमातून ही कृती केली असल्याची प्रतिक्रिया जाधव यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घटनास्थळी आले होते. त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. काही तासांत ही आग आटोक्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

-“महाराज कीर्तनातून नेहमी चांगले उपदेश देतात, त्यांच्याबद्दल सरकारची भूमिका वाईट नाही”

-इंदुरीकर महाराजांच्या बोलण्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला वाटतं नाही- रूपाली पाटील

-महाराज फक्त आवाज द्या…. ताकदीनिशी रस्त्यावर उतरतो- महेश लांडगे

तृप्ती देसाईंवर टीका करणाऱ्या इंदुरीकर भक्तांचा किशोरी शहाणेंनी घेतला खरपूस समाचार!

-ऐ भावा, इंदुरीकरांची कसली भारी हवा….. चाहत्यांनी बैलगाडीतून काढली मिरवणूक!