नाट्यक्षेत्रातील दोन धक्कादायक घडामोडी; जयंत पवारांच्या पोस्टमुळे खळबळ

मुंबई | मुंबई आणि पुण्यात नाटकाचे प्रयोग सुरू असताना पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या दोन वेगवेगळ्या घटनांवर ज्येष्ठ नाटककार आणि लेखक जयंत पवार यांनी उद्विग्नता व्यक्त करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. कलाक्षेत्रातील मान्यवरांना उद्देशून लिहिलेलं त्यांचं पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या महिन्यात दिल्लीहून मुंबईत आलेल्या जन नाट्य मंचाच्या ‘तथागत’ नाटकाच्या प्रयोगावेळी पोलिसांनी चौकशी केली होती. इतकंच नाही तर मंचाच्या प्रमुख सुधन्वा देशपांडे यांचीही चौकशी केल्याचं समोर आलं आहे.

किस्सा कोठी नावाच्या ग्रुपच्या ‘रोमिओ रविदास और ज्युलिएट देवी’ या हिंदी नाटकातील कलाकारांचीही चिंचवड येथील हॉटेलमध्ये जाऊन झाडाझडती घेतली. या दोन्ही घटनांवर जयंत पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.

जयंत पवार यांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कुणाचीही मुस्कटदाबी झालेली मान्य करू शकत नाही, असंही त्यांनी पत्राद्वारे ठणकावून सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-