मयताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार सुरूच; मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं

मुंबई | कोरोनाशी दोन हात करण्यासाठी अत्यावश्यक बनलेल्या मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार सुरू झाला आहे. मुंबई पोलिसांनी विमानतळाजवळील एका गोदामावर धाड टाकत जवळपास 4 लाख मास्क जप्त केले आहेत. याची किंमत अंदाजे 1 कोटी रूपये आहे. (Mumbai Police, police seized 4 lakh face masks worth around Rs 1 crore from a godown)

कोरोनामुळे सॅनिटायझर आणि मास्कच्या मागणीमध्ये प्रचंढ वाढ झाली आहे. या वस्तुंची टंचाई निर्माण होणार नाही याची खबरदारी राज्य सरकारकडून घेतली जात असताना मास्क आणि इतर वस्तुंचा काळाबाजार सुरू असल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. (Mumbai Police, police seized 4 lakh face masks worth around Rs 1 crore from a godown)

मंगळवारीही मुंबईमध्ये मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार उघडकीस आला. दुकानदार मास्क आणि सॅनिटायझरचा साठा करत होते आणि साठा करून चढ्या भावाने विकत होते. साहजिकच ग्राहकांसाठी ही किंमत अतिशय उच्च होती. कालही मुंबईमध्ये काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

दरम्यान, संकटाच्या कठीण काळात असे प्रकार अजिबात व्हायला नकोत. उलट या काळात सगळ्यांनी सगळ्यांशी माणुसकीने वागलं पाहिजे. जर या ही काळात कुणी पैसे कमवण्याच्या उद्देशाने असले प्रकार करत असतील तर शासन त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या – 

-घरात बसून मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यांचं ऐका; उद्धव ठाकरेंचा मिश्किल अंदाज

-संकटाच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी संघाचे स्वयंसेवक तयार- मोहन भागवत

-लॉकडाऊनच्या काळात कंडोमची मागणी वाढली; विक्रेतेही चक्रावले

-कोरोनाच्या भीषण संकटात सानिया मिर्झा गरिबांना करणार मदत

-हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाला हरवून गुढीपाडवा साजरा करु- उद्धव ठाकरे