मनसेच्या मदतीने मुंबई पोलिसांनी ठोकल्या बांगलादेशी घुसखोरांना बेड्या!

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रविवारी मुंबईत पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोरांविरोधात गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानपर्यंत विराट मोर्चाचं आयोजन केलं होतं. या मोर्चानंतर मुंबई पालिसांनी मनसेच्या मदतीने कारवाई सुरू केल्याच दिसत आहे.

दहशतवाद विरोधी पथक व मानवी तस्करी विरोधी शाखेने कारवाई करून 23 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं. त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. याबाबतची माहिती मनसेच्या स्थानिक शाखेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याचं समजतंय.

विरार पश्चिम येथील कळंब, अर्नाळा परिसरातून मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी पंच म्हणून पोलिसांसोबत घटनास्थळी जात कारवाईसाठी पोलिसांना मदत केली. पळून जाणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यासही मदत केली.

दरम्यान, हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले होते असं पोलीस तपासात उघड झालं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-दिल्लीत नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेस नेत्यांना राजीनामा देण्याची घाई; मतभेद चव्हाट्यावर

-BSNLचा खासगी टेलिकॉम कंपन्यांना दणका; आता 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा

-दिल्लीत जंग-जंग पछाडून भाजप पराभूत; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया??

शरद पवारांच्या होमग्राउंडवर रंगणार पहिलाच रणजी सामना!

-थोरात, भुजबळांच्या बंगल्यांवर डागडुजीसाठी होणार सर्वाधिक खर्च!