फडणवीसांची ती योजना सुरूच ठेवणार; राज्य सरकारची माहिती!

मुंबई | मराठवाडा वॉटर ग्रीड बंद होणार नाही, असं सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे. आज मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मराठवाड्याच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठक पार पडल्यानंतर अमित देशमुख यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड बंद होणार प्रकल्प बंद होणार नाही, असं मोठं आणि महत्त्वाचं विधान केलं आहे.

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मराठवाड्यातील सर्व मंत्री तसेच महत्त्वाचे नेते यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक पार पडली. माध्यमांसमोर येत मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प ठाकरे सरकारने स्थगित केलेला नाही, असं मंत्री अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

लातूर, उस्मानाबाद आणि बीड या जिल्ह्यांत मोठा पाण्याचा प्रश्न आहे. हाच पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या योजनेच्या माध्यमांतून प्रयत्न केला जाणार आहे, असं अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

मराठवाड्याला मुबलक पाणी मिळावं आणि मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड ही योजना आखली होती. मात्र याच योजनेला ठाकरे सरकारने ब्रेक लावण्याचे संकेत दिले होते. मात्र आजच्या बैठकीतून हा प्रकल्प थांबवण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचं अधोरेकित करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत नेस्तनाबूत झालेल्या काँग्रेस नेत्यांना राजीनामा देण्याची घाई; मतभेद चव्हाट्यावर

-BSNLचा खासगी टेलिकॉम कंपन्यांना दणका; आता 96 रुपयात महिनाभर रोज मिळणार 10GB 4G डाटा

-दिल्लीत जंग-जंग पछाडून भाजप पराभूत; पाकिस्तानात काय प्रतिक्रिया??

शरद पवारांच्या होमग्राउंडवर रंगणार पहिलाच रणजी सामना!

-थोरात, भुजबळांच्या बंगल्यांवर डागडुजीसाठी होणार सर्वाधिक खर्च!