राणा दाम्पत्याबाबत मुंबई पोलिसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती.

शिवसैनिकांनी राणांच्या घरासमोर जावून जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशात राणा दाम्पत्याबाबत मुंबई पोलिसांनी केलेल्या दाव्याने खळबळ माजलीये.

आम्हाला केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करायचं होतं, असा भोळेपणाचा आव आणत आरोपी राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी हा प्रकार तितकासा साधासरळ नाही. महाविकास आघाडी सरकारच्या अस्तित्वालाच आव्हान देण्याचा मोठा डाव त्यामागे होता, असं पोलिसांनी म्हटलंय.

सत्तेपासून वंचित असलेला भाजप आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विरोधक हे जाणीवपूर्वक सरकारविरोधी वातावरण तयार करून आघाडी सरकार उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा पोलिसांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचे घोषित करून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत राज्य सरकारच्या यंत्रणेलाच आव्हान दिले, अशा आरोपाखाली भादंविच्या राजद्रोह कलमासह अन्य कलमांखाली नोंद झालेल्या गुन्ह्यात राणा दाम्पत्य सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

 महत्त्वाच्या बातम्या- 

MPSC परीक्षेचा निकाल जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला

‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’; उद्धव ठाकरेंचा सवाल

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, तर अजितदादा गडकरींच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

काळजी घ्या! पुढील 4 दिवस महत्त्वाचे; राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास खलबतं