“…तर आम्ही अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार”

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्यात पोहोचले असून थोड्याचवेळात ते औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसेचे नेते अमित ठाकरे कालच औरंगाबादमध्ये पोहोचले होते.

अमित ठाकरे यांनी सभास्थळाला भेट देऊन तयारीचा आढावा घेतला आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी मोठं वक्तव्य  केलं आहे.अमित ठाकरे यांनी आम्ही राज ठाकरेंचे सैनिक आहोत आणि अंगावर केसेस दाखल करुन घ्यायला तयार आहोत, असं अमित ठाकरे म्हणालेत.

काही पक्षप्रवेश होणार होते त्यामुळे मी कालच औरंगाबादमध्ये दाखल झालो होतो. आज सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी आलो आहे. तयारी खूप उत्तम झालेली असून सभेची प्रचंड उत्सुकता सर्वांमध्ये आहेत. उद्याची सभा जोरदार होईल यात शंका नाही, असं अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा होत असून यासाठी मनसैनिकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.

दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथील सभा होणार की नाही, याचा सस्पेन्स संपला असून पोलिसांनी राज यांच्या सभेला आज सशर्त परवानगी दिली आहे.

महाराष्ट्र दिनी राज यांची ही सभा होणार असून यासाठी 16 अटी घालण्यात आल्या आहेत. यावर मनसेकडून पहिली प्रतिक्रिया आली असून पक्षाने पोलिसांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

राणा दाम्पत्याबाबत मुंबई पोलिसांचा खळबळजनक दावा, म्हणाले…

राणा दाम्पत्याला मोठा झटका, महत्त्वाची माहिती समोर

‘बाबरी मशिद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते?’; उद्धव ठाकरेंचा सवाल

MPSC परीक्षेचा निकाल जाहीर; सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला