अबब…मुंबईतील भिकाऱ्याच्या श्रीमंतीची आकडा एकून तुम्हालाही आकडी येईल!

मुंबई : मुंबईतल्या गोवंडी रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी एका व्यक्तिचा रुळ ओलांडताना मृत्यू झाला. पिरबीचंद आझाद(वय 82) असं त्या व्यक्तिचं नाव असून तो भीक मागून आपलं पोट भरत होता. अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

घरात जाऊन पोलिसांनी जेव्हा पाहणी केली. तेव्हा पोलिसांनाही त्या भिकाऱ्याची श्रीमंती पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्या भिकाऱ्याकडे सगळे मिळून 10 लाखांच्या जवळपास रक्कम होती. मुंबईत भिकाऱ्यांच्या अनेक टोळ्या असून त्यांचं एक वेगळच जग असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

त्याच्या झोपडीत चिल्लर पैसे आणि नोटांनी भरलेल्या काही गोणी पोलिसांना आढळल्या. यात लाखोंची चिल्लर तसच बँकेतील लाखोंच्या ठेवीची कागदपत्रे आढळून आली आहेत.

चिल्लरची रक्कम 1 लाख 50 हजार पेक्षा अधिक असण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. तर ठेवीची रक्कम देखील 8 लाख 77 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. 

पिरबीचंदचा रेल्वे रूळ ओलांडताना शुक्रवारी रात्री अपघात झाला होता. त्याला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण दाखल करण्यापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आले. रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात देण्याच्या उद्देशाने त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरु केला. 

महत्वाच्या बातम्या-