कोरोनामुळे सर्व मंडळांनी यावर्षी देखावे आणि मिरवणुक टाळाव्यात; पुण्याच्या महापौरांचं आवाहन

पुणे | कोरोनामुळे आपल्याला यावर्षी आपल्याला आवडत्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला देखावे आणि मिरवणुक काढता येणार नाही. यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधधर मोहोळ यांनी सर्व गणेश मंडळांना यासंबंधीत आवाहन केलं आहे.  येणाऱ्या गणेशत्सवानिमित्त आज महापालिकेने बैठक बोलावली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण दक्षता घेत आहोत. शहरात होणाऱ्या जम्बो हॉस्पीटलच्या उभारणीसाठी हातभार लावावा, असं आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात आलं आहे.

गणेश मुर्तींचे विसर्जन मंडळांच्या जवळ घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावं आणि मंडळांनी मंडप टाकण्याऐवजी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी. भाविकांना डीडिटल पद्धतीने दर्शन घेता यायला हवं अशी सुविधा गणेश मंडळांनी करावी, असंही मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोनाचं संकट अजूनही कायम आहे. शतकोनशतके चालत आलेली पंढरी वारी खंडीत करून, यावर्षी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पादुका थेट पंढरपूरला नेण्यात आल्या. अशावेळी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी देखील सांमजस्याची भूमिका घेऊन यंदाच्या वर्षी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना मंडपात न करता आहे, त्या मंदिरातच करावी, असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“राज्य सरकारने मुंबईकरांना प्रत्येकी 10 हजारांची मदत करावी, पाणी येण्याआधी नालेसफाई केली की हातसफाई?”

‘चंद्रकांत पाटील म्हणजे विरोधकांना जीवनातून उठवणारे’; राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांचं पाटलांवर टीकास्त्र

“मंदिर तोडणारे तुमचेच पूर्वज होते, त्रास होत असेल तर पाकिस्तानात जावं”

…म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसचे सर्व मंत्री थेट सोनिया गांधींना भेटणार

चीनसोबत सामना तर लांबच पण चीनचं नाव काढायची हिम्मतही मोदींमध्ये नाही- राहुल गांधी