…म्हणून नागराज मंजुळेंना पुण्यात शिकत असताना वाटायची भीती

पुणे | कोणतीही भाषा हे संवादाचे माध्यम आहे. ताे आशय नाही. त्यामुळे एखाद्याची भाषा कशी आहे?, हे पाहण्यापेक्षा ताे काय बाेलताेय , त्याचा नेमका अर्थ काय आहे हे पाहायला हवं, असं वक्तव्य लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे.मराठी दिनानिमित्त जागतिक मराठी अकादमीतर्फे नागराज मंजुळे यांच्या प्रकट मुलाखतीचे आयाेजन आज बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आलं होतं.

मला माझी भाषा बाेलणारी पात्र सिनेमांमध्ये हवी हाेती. त्यामुळे माझ्या सिनेमांमधील पात्रे तशी भाषा बाेलतात. पुण्यात शिक्षणासाठी आलाे तेव्हा मला माझ्या भाषेचा न्यूनगंड हाेता. विद्यापीठात असताना मलाही इंग्रजीची भीती वाटत असल्याचं नागराज मंजुळे यांनी म्हटलं आहे.

अमिताभ यांना भेटायला गेलाे तेव्हा आमची अर्ध्या तासाची भेट ठरली हाेती. पण तासापेक्षा जास्तवेळ आम्ही गप्पा मारल्या. त्यांच्यासाेबत जर इंग्रजी बाेलायची वेळ आली तर आम्ही आमच्या एका सहकाऱ्याला साेबत घेतले हाेते परंतु तशी वेळ आली नसल्याचंही मंजुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, वात्रटीकाकार रामदास फुटाणे आणि निर्माते, दिग्दर्शक विवेक वाघ आणि मंजुळे विविध विषयांवर मंजुळे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. तसेच सैराटचा आपला प्रवासही मंजुळेंनी उलगडून सांगितला.

महत्वाच्या बातम्या-

-भास्कर जाधवांनी विचारला थेट शिवसेनेलाच प्रश्न म्हणाले…

-दिल्लीकरांनो काही समाजकंटक सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत- अमित शहा

-विलासराव देशमुखांवर बायोपिक काढणं सोपं नाही- रितेश

-सगळं काम अजित पवारच करतायेत… मुख्यमंत्री काहीच करत नाहीत- नारायण राणे

-आम्ही कोणत्याही कामांना स्थगिती देत नाही, आम्ही विकासाचे मारेकरी नाही- मुख्यमंत्री