पुणे | लोकशाहीत आपले विचार, भावना मांडण्याचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच असले पाहिजे. मात्र सध्या सर्वसामान्यांपासून पत्रकारांपर्यंत कोणालाही सरकारवर टीका करता येत नाही किंवा आपलं मत मांडता येत नाही. त्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे होत आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केली आहे.
सर्वसामान्यांना धाडसाने बोलता आले पाहिजे, तेव्हाच लोकशाही यशस्वी होईल. मात्र, सध्या लोक उघडपणे बोलालया घाबरत आहे. ही बाब लोकशाहीसाठी चिंताजनक आणि घातक आहे. केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नाही, असंही मत कोतापल्ले यांनी व्यक्त केले आहे. एस. एस. जोशी सभागृहात एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
कोणत्याही पक्षाशी आणि विचाराशी एकनिष्ठ असणं महत्त्वाचं आहे. अन्यथा त्या विचारांना काहीही अर्थ उरणार नाही. या जागतिकीकरणाच्या काळात प्रत्येक जण स्वत:ला विकून घेण्यास तयार आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सध्याची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. तुमचा आवाज दाबला जात आहे. मात्र, देशाला हुकुमशाहीकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला आवाज उठवत राहावाच लागेल, असं कोतापल्ले म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
“2024 पर्यंत सर्व घुसखोरांना देशाच्या बाहेर काढणार” – https://t.co/JOwnAYo8Ur @AmitShah @BJP4Maharashtra #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
‘चांद्रयान 2’ मोहिमेतील विक्रम लँडरचा पत्ता लागला! – https://t.co/HpWGwFtfQk #Chandrayaan2 @NASA #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019
भाजपचा गढ असलेल्या पूर्व विदर्भात शिवसेनेला वर्चस्वाची संधी – https://t.co/yYwY2YQoRS @BJP4Maharashtra @ShivSena
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) December 3, 2019