उस्मानाबादमध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य; एकत्र झालं नमाज आणि हमुमान चालीसाचं पठण

उस्मानाबाद | उस्मानाबादमध्ये  हिंदू-मुस्लीम ऐक्याचं एक चांगलं उदाहरण पाहायला मिळालं आहे. मानवता हाच खरा धर्म असा नारा देत उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे हिंदू-मुस्लिमांनी एकत्र येत नमाज व हनुमान चालीसा पठण केलं.

सर्व धर्म एक आहेत, केवळ राजकीय हेतूने सध्याचं राजकारण सुरु आहे. फोडा आणि राज्य करा ही निती आजही वापरली जात आहे. मात्र तरुणांनी एकत्र यावं असा संदेश यावेळी देण्यात आला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांसदर्भात अत्यंत आक्रमक भूमिका घेत भोंगे खाली उतरवण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला आज म्हणजेच 4 मे रोजीपर्यंतचा अल्टिमेटम दिला होता.

राज ठाकरे यांनी काल ट्विट करून पुन्हा एकदा आंदोलनावर ठाम असल्याचे जाहीर केलं होतं. त्यांनी केवळ मनसे कार्यकर्ते नव्हे, तर देशभरातील हिंदुंना उद्देशून हे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यात बुधवारची पहाट नेमकी कशी होणार याबाबत सर्वांचा चिंता होती.

भोंग्यावरून राज्यातील वातावरण तापलेलं असताना अनेक ठिकाणी हिंदू -मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं.

आज काय होणार, भोंगा वाजणार, की हनुमान चालीसा याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. मात्र, ना भोंगा वाजला नाही हनुमान चालीसा, अनेक ठिकाणी पहाटेची पहिली अजान ही भोंग्याविना झाली. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण शांत असल्याचं चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या- 

संदीप देशपांडेंनी पोलिसांना चकवा देत काढला पळ; झटापटीत महिला पोलीस जखमी

‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ 

मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं  

…तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं? 

भोंगा प्रकरणी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; उचललं मोठं पाऊल