संदीप देशपांडेंनी पोलिसांना चकवा देत काढला पळ; झटापटीत महिला पोलीस जखमी

मुंबई | भोंग्यांवरून राज्यातील वातावरण तापलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे.

मुंबईत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अशात दादरमध्ये मोठा ड्रामा पाहायला मिळाला आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला आहे. कारण पोलिस ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे यांनी पळ काढला.

शिवतीर्थबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी मुंबई पोलीस मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी आले होते. मात्र ते पोलिसांच्या हातून निसटले आणि तेथून निघून गेले.

शिवतीर्थबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. यावेळी झटापटीत एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे.

दरम्यान, पुण्यातही राज ठाकरे यांनी आरती केलेल्या खालकर चौक येथील मारुती मंदिरात हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं. मंदिरात महाआरतीदेखील करण्यात आली. यानंतर पोलिसांनी मनसेचे अजय शिंदे यांच्या सह कार्यकर्त्याना ताब्यात घेतलं.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वात मोठी बातमी! अखेर नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर

‘महाराष्ट्रात माझं सरकार येईल तेव्हा…; राज ठाकरेंनी शेअर केला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना व्हिडीओ 

मोठी बातमी! नवनीत राणा यांची प्रकृती पुन्हा खालावली, जे जे रूग्णालयात हलवलं  …तेव्हा रात्री अडीच वाजता राज ठाकरेंना अटक झाली होती, वाचा नेमकं प्रकरण काय होतं? 

भोंगा प्रकरणी उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; उचललं मोठं पाऊल