राजकारण माझा पिंड नाही पण…- नाना पाटेकर

पुणे | मला राजकारणात येण्याची ऑफर होती. पण माझा तो पिंड नाही. कारण तिथं गेलो तर कोणकोणत्या पक्षात जायचं. एका वेळेनंतर पक्ष उरायचेच नाही. शेवटी मी एकटाच रहायचो, असं ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितलं आहे.

आपल्याला पाच वर्षाने मतदान करण्याचा हक्क मिळतो. मात्र आपण त्यांचे धिंडवडे काढतो. कारण आपण फक्त मत देतो. पण त्यांना प्रश्न विचारत नाही, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत. ते पुण्यात एका मुलाखतीमध्ये बोलत होते.

भाजप, शिवसेना, काँग्रेस,राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षाची नियमावली चांगली आहे. फक्त त्यांची अंमलबजावणी आणि पायमल्ली हाच फरक, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, अपमान आणि भूक हे दोन माझे गुरू आहेत. कारण हे दोन्ही गुरू आयुष्य शिकवतात. मला त्यांनीच घडवलं. सुरूवातीच्या काळात अशोक सराफ मला खूप मदत करायचे, असंही नाना पाटेकर यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-