शाळेतील आंबट शौकीन शिक्षक करायचा अश्लील व्हिडिओ वायरल; कारनामा उघड

मुंबई | मुंबई महानगरपालिकेने एका शिक्षकाला योगासनाचा व्हिडिओ शालेय ग्रप वर टाकल्या प्रकरणी निलंबित केलं आहे. हा शिक्षक स्वत:च्या घरातच रामदेवबाबांप्रमाणे छोटसं  धोतर नेसून योगासन करत होता. आणि तोच व्हिडिओ त्याने शाळेच्या व्हाॅट्सअ‌ॅप ग्रुपवर पोस्ट केला. महत्वाचं म्हणजे या ग्रुपमधे शाळेतील महिला शिक्षकांचाही समावेश आहे. याच महिला शिक्षकांनी या व्हिडिओवर आक्षेप घेतला आहे.

हा आक्षेप केवळ योगासनाचा व्हिडिओ ग्रुपवर टाकल्याप्रकरणी नाही तर हा शिक्षक अनेक अश्लील व्हिडिओ या ग्रुपवर टाकत होता. वारंवार सांगून देखील त्याने व्हिडिओ ग्रुपवर टाकणं थांबवलं नाही.

या प्रकरणी शिक्षकांनी नगरसेवक मंगेश सातमकर यांच्याकडे तक्रार केली. मंगेश सातमकर यांनी शिक्षण विभागाला या शिक्षकावर कारवाई करण्यास सांगितले. परंतु दोन वेळा तक्रार करूनही पालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाई केली नाही.

अखेर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सातमकरांनी हा विषय शिक्षण समिती सभेत उपस्थित केला. तेव्हा शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी संबंधित शिक्षकाला चौकशी होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-