“सहा जिल्ह्यांचा पालकमंत्री? म्हणजे काय तो स्पायडरमॅन आहे का”?

मुंबई | राज्य सरकारकडून महाराष्ट्राच्या जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे एक- दोन नाही तर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

यावर आता विरोधी पक्ष टीका करत आहेत. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी खोचक शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला दिला आहे.

हा पालकमंत्री काय स्पायडकमॅन आहे का, असा प्रश्न नाना पटोले यांनी विचारला आहे. शिंदे फडणवीस सरकारने तीन महिन्यांनी जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

नाना पटोले म्हणाले, एक तर त्यांनी अत्यंत उशीर करत जिल्ह्यांना पालकमंत्री दिले. त्यात गंभीर बाब म्हणजे एका मंत्र्याला सहा जिल्हे दिले आहेत. हा पालकमंत्री स्पायडरमॅन आहे का, असे पटोले म्हणाले आहेत.

सहा जिल्ह्यांच्या विकास कामांसाठी ते वेळ कसा देणार, या दोघांच्या वादत जिल्ह्यातील विकास कामांचा बोजवारा उडाला आहे, असे देखील नाना पटोले (Nana Patole) म्हणाले.

शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदी शहा यांचे हस्तक असल्याचे जाहीरपणे सांगतात. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला (Gujarat) पाठविले जातात. आता तर महाराष्ट्राचे दोन मंत्री गुजरातला जाऊन आले. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला कसे पाठवायचे, याचा अभ्यास करायला ते गेले होते का, असा प्रश्न नाना पटोलेंनी विचारला.

तसेच महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करते आहे. दिल्लीला विचारल्याशिवाय ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचे पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

‘मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंद्यावर गंभीर आरोप’ म्हणाले यांचे लोक…

छगन भुजबळांच्या सरस्वती वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची प्रहिली प्रतिक्रिया

“आरएसएसवर बंदी घाला” या काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मग घ्या ना धौती योग!’ म्हणत आशिष शेलारांचे शिवसेनेला पत्र; वाचा सविस्तर पत्र