‘मनसेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंद्यावर गंभीर आरोप’ म्हणाले यांचे लोक…

मुंबई | मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai Municipal Corporation Elections 2022) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे, भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा गट अशी तीन पक्षांच्या युतीची चर्चा रंगली आहे.

पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून मनसेचे मुंबईतील पदाधिकारी फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेच्या सरचिटणीस संजय नाईक (Sanjay Naik) यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेच्या अनुषंगाने मनसेने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. भाजपसोबत हातमिळवणीची देखील चर्चा सुरु केली आहे. मागील काळात शिंदे यांच्या गटासोबत देखील राज ठाकरे यांची जवळीक वाढली आहे.

पण आता शिंदे यांच्याकडून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा आरोप शिंदे यांच्यावर झाल्याने प्रकरण तापले आहे. विविध प्रकारची आमिषे आणि पदांची लालूच दाखविली जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्याकडून मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात असल्याचे देखील संजय नाईक म्हणाले आहेत. त्याचबरोबर मनसे आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असे देखील नाईक म्हणाले.

भायखळ्यात शिंदे यांच्या गटातील लोक मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांना विविध प्रलोभने दाखवत आहेत. शिंदे गटासमोर आधीच एक शत्रू आहे, पण ते आणखी शत्रू का निर्माण करत आहेत, असे नाईक यांनी म्हंटले.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या गटातील नेत्यांना समज द्यावी. शिंदे गटाने आणखी शत्रू निर्माण करुन त्यांच्या पायावर धोंडा मारुन घेऊ नये, असा सल्ला देखील संजय नाईक यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या –

छगन भुजबळांच्या सरस्वती वक्तव्यावर एकनाथ शिंदे यांची प्रहिली प्रतिक्रिया

“आरएसएसवर बंदी घाला” या काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले,

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवाईवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

मग घ्या ना धौती योग!’ म्हणत आशिष शेलारांचे शिवसेनेला पत्र; वाचा सविस्तर पत्र

टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात