“सांगे कीर्ती बापाची, तो एक मुर्ख”; नाना पटोलेंवर खोचक टीका

मुंबई | देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. पण आपल्या देशात नेहमीच स्वातंत्र्यासाठी कोणाचं योगदान जास्त हा वाद जास्त रंगलेला असतो. आताही काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार आरोप केले आहेत.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाजपचा हात नव्हता. भाजप आणि आरएसएसचं देशाच्या स्वातंत्र्यात काहीच योगदान नाही, परिणामी भाजपला इतिहासही नाही आणि भविष्यही नाही, अशी जहरी टीका नाना पटोले यांनी केली होती.

नाना पटोले यांच्या या टीकेवरून सध्या राज्यात जोरदार वाद पेटला आहे. भाजपनं नाना पटोले यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध केला आहे. नाना पटोले यांच्यावर मुंबई भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शितल देसाई यांनी जहरी टीका केली आहे.

इतिहासात रमणाऱ्या नाना पटोले यांनी जो इतिहासात रमतो त्याला भविष्य नसते ही बाब लक्षात ठेवावी, असं देसाई यांनी नाना पटोले यांना म्हटलं आहे. देसाई यांनी नाना पटोले यांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे.

80-90 वर्षांपूर्वी देशाच्या स्वातंत्र्यात सहभागी झालेल्या आणि योगदान दिलेल्या नेत्यांचे दाखले देणे नाना पटोले यांनी थांबवावे, असं देसाई म्हणाल्या आहेत. सांगे किर्ती बापाची तो एक मुर्ख हे रामदास स्वामींचे वचन पटोले यांनी लक्षात ठेवावे असं देसाई म्हणाल्या आहेत.

मुळात पटोले काय राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा यांचा कोणाचाही स्वातंत्र्यात काडीचारी संबंध नाही. म्हणून यांना त्या नेत्यांच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार नाही, असं देसाई म्हणाल्या आहेत.

बापजाद्यांच्या मोठेपणाचे-दानशुरपणाचे दाखले देणाऱ्या फुकट्या वाचाळविरांना कोणी फारशी किंमत देत नाही. हे पटोले यांना जेवढे लवकर समजेल ते देशाच्या हिताचं आहे, असंही देसाई म्हणाल्या आहेत.

स्वातंत्र्यानंतर जे देशाला मिळालं ते काॅंग्रेसला टिकवता आलं नाही. परिणामी देशाची बरबादी करण्याचं काम काॅंग्रेसनं केलं आहे, अशी घणाघाती टीका देसाई यांनी केली आहे.

स्वातंत्र्यानंतरही गेल्या सत्तर वर्षात देशात गरीबी, विषमता, अत्याचार या गोष्टींची कसलीही कमतरता नाही. परिणामी काॅंग्रेसचे उगाच वायफळ बडबड करत असतात, असंही देसाई म्हणाल्या आहेत.

दरम्यान, देसाई यांनी काॅंग्रेसवर जोरदार टीका केल्यानंतर राज्यात आता काॅंग्रेस आणि भाजपमधील वाद आणखीन वाढण्याची चिन्ह आहेत. परिणामी देसाई यांच्या या टीकेवर काॅंग्रेस काय उत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

  ‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

  शरद पवारांचा नवाब मलिक यांना पाठिंबा, म्हणाले…

  कंगनानं गांधीजींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…