शाळेची घंटा पुन्हा वाजणार! लवकरच पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता

मुंबई | गेल्या दोन वर्षांपासून कोरोना साथीने संपुर्ण जगभरात हाहाकार माजवला होता. सर्वच क्षेत्रांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात एक निराशाजनक बाब म्हणजे निरागस चिमुकल्यांची शाळा बंद झाली होती. शाळेत खेळण्या बागडण्याचा आनंद या कोरोनाने हिरावून घेतला होता. दोन वर्षांनंतर आता देशासह राज्यभरात आशादायी चित्र असून लहानग्यांच्या शाळेची घंटा आता वाजण्याची शक्यता आहे.

राज्यातील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे पहिलीच्या वर्गापासून सरसकट शाळा सुरू करण्याकरिता राज्य सरकराने हालचाली सुरू केल्या आहेत. प्राथमिक शाळा सुुरू करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. तसेच टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं देखील कळतयं.

कोरोना विषाणूची साथ आल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सद्यस्थितीत राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे जवळपास सर्वच लसीकरण झालेले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याची शक्यता आहे. घटलेल्या रूग्णसंख्येमुळे राज्यात इयत्ता पहिले ते चौथी शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.

मात्र, अजूनही लहान मुलांचं लसीकरण सुरू करण्यात आलेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत  केंद्र सरकारला विचारले असता त्यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे, असं उत्तर केंद्र सरकारकडून देण्यात आलं होतं.लवकरचं देशभरात लहानग्यांचं लसीकरण सुरू होऊ शकतं.

राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या विकासाबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत माहिती दिली होती. राज्यातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक आणि भौतिक विकास साधता यावा यासाठी शासनाने आदर्श शाळा हा महत्त्वपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतंं.

तसेच मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती. हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम असून यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असंही त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे

शाळाच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासाठी राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

यावेळी वर्षा गायकवाड मराठवाडा विभागातील दुरुस्तीबाबत निर्देश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात मराठवाडा विभागातील निजामकालीन शाळांची दुरुस्ती आणि पुर्नबांधणीसाठी निधी वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भारतात गेल्या 24 तासांमध्ये 10 हजार 197 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच देशातील 12 हजार 134 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील रूग्णसंख्या देखील आटोक्यात आहे. मंगळवारी महाराष्ट्रात 886 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली. तर 984 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

इंधन दरवाढीचा परिणाम आता रिक्षावरही; केली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

  ‘पार्ट टाईम मुख्यमंत्री’; भाजपच्या या टीकेवर शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

  शरद पवारांचा नवाब मलिक यांना पाठिंबा, म्हणाले…

  कंगनानं गांधीजींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…