बाळासाहेब असते तर जी आघाडी सध्या झाली आहे ती झालीच नसती- नारायण राणे

नागपूर | आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. तसंच जी आघाडी सध्या झाली आहे ती देखील झाली नसती, असं वक्तव्य भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्रीपद मिळवायचं या एकाच उद्देशाने महाविकास आघाडी झाली. विचारांना मूठमाती देऊन हे सरकार अस्तित्त्वात आलं आहे. या सरकारने विद्यार्थी, शेतकरी, बेरोजगार यांच्यासाठी कोणताही विचार केलेला नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

नव्या सरकारचं अधिशवेशन हे अधिवेशन नाही. एखादा घरगुती कार्यक्रम वाटत असल्याचा, टोला नारायण राणे यांनी लगावला आहे. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरुन होत नाही, अशी टीका नारायण राणें यांना केली आहे.

दरम्यान, सरकारची कामगिरी कशी वाटते?, असं विचारलं असता, नेमकं काय चाललंय याची माहिती घेऊन बोलेन, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं.

महत्वाच्या बातम्या-