गेल्या दीड महिन्यापासून बिन पैशांचा तमाशा सुरु- राज ठाकरे

पुणे | गेल्या दीड महिन्यापासून जो बिन पैशांचा तमाशा सुरु होता, त्यावर चर्चा करण्यासाठी आज संवाद शिबीर आयोजित केल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सविस्तर माहिती घेऊन त्यावर चर्चा करण्यासाठी आणि इतरही विषयांबाबत चर्चा करण्यासाठी संवाद शिबीर आयोजित केलं होतं. बाकी उद्या सविस्तरपणे बोलणार असल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच राज ठाकरे उद्या पुण्यात पत्रकार परिषद  घेणार आहेत.

जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात मुंबईमध्ये मनसेचं महाअधिवेशन आयोजित करण्यात येणार आहे. नागरिकत्व कायद्यावरुन राज्यात जे आंदोलन सुरु आहे तसेच नवीन सरकारची कामगिरी या सर्व विषयावर राज ठाकरे बोलणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, नवीन वर्षात मनसेचं महाअधिवेशन आयोजित केलं जाणार आहे. मनसेच्या महाअधिवेशनाला राज्यभरातून एक लाख कार्यकर्ते येतील, असा अंदाज मनसेकडून वर्तवला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-