“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांना विनंती करतो, महाराष्ट्रात लष्कराच पाचारण करा”

मुंबई | भाजपचे राज्यसभेचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीये. महाराष्ट्रातील कोरोनाचा आकडा 3 हजाराच्या वर गेला आहे, रुग्ण वाढ आणि मृत्यूला हे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

धारावीसारख्या ठिकाणी ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्या महाराष्ट्र सरकारने केल्या नाहीत, केरळ, राजस्थानमध्ये जे झालं ते महाराष्ट्रात झालं नाही, तशी खबरदारी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये घेतली नाही, असं नारायण राणे यांनी सांगितलंय.

महाराष्ट्रातील मृतांची संख्या वाढतेय याची चीड येतेय, अन्य राज्यांनी त्यावर नियंत्रण मिळवलं, मग प्रगत महाराष्ट्राला का जमत नाही? हे सरकार सपशेल फेल आहे, असा हल्लाबोल नारायण राणेंनी केला.

महाराष्ट्रात तीन पक्षांचं हे सरकार आहे, या सरकारचं कौतुक कशाबद्दल करायचं? बाकीच्या राज्यातील आकडे बघा आणि महाराष्ट्रातील कोरोनाचे आकडे बघा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांना विनंती करतो की महाराष्ट्रात तातडीने लष्कर पाचारण करा, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-आज मोदींवर टीका करण्याची वेळ नाही- राहुल गांधी

-लॉकडाउन हे भारताने वापरलेलं सर्वात प्रभावी अस्त्र- डॉ. रमण गंगाखेडकर

-“सरपंच आणि पोलीस पाटलांना 25 लाखांचं विमा संरक्षण द्या”

-मुंबईकरांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा डोस देण्याचा निर्णय रद्द

-फक्त लॉकडाऊनने कोरोना जाणार नाही- राहुल गांधी