“शिवसेना पक्षप्रमुखच मराठी माणसांच्या मुळावर उठलेत”

मुंबई | शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यात मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये शाब्दिक वाद रंगला आहे.

संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपकडून शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.

नारायण राणेंच्या जुहू येथील बंगल्याला मुंबई महापालिकेनं नोटीस बजावल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. नारायण राणेंना अनधिकृत बांधकामाबाबत पालिकेनं नोटीस पाठवली आहे.

नारायण राणेंनी नोटीस आल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चांगलंच घेरलं आहे. उद्धव ठाकरेंवर राणेंनी मराठी माणसांच्या हक्कांची आठवण काढत टीका केली आहे.

माझं घर हे तलाठी असलेल्या एका आर्किटेक्चरकडून बनवण्यात आलं आहे. 1989 मध्ये महापालिकेच्या सर्व परवानग्या घेऊन आम्ही घर बांधलं आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

माझी इमारत 100 टक्के कायदेशीर असताना शिवसेनेकडून मुद्दाम तक्रार करण्यास सांगण्यात आलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी शिवसेना स्थापन केली होती, असं नारायण राणेंनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांनी मराठी माणसांसाठी शिवसेना काढली पण आज शिवसेनेचे पक्षप्रमुखच मराठी माणसांच्या मुळावर उठले आहेत, अशी जहरी टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

दरम्यान, नारायण राणेंना महापालिकेनं नोटीस पाठवल्यानंतर राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार वाद वाढला आहे. राणेंच्या मुलांनी देखील शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

राज्यातील ‘या’ भागात आज पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…”