नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, म्हणाले….

मंबई | सध्या शिवसेना आणि भाजप ( BJP) नेत्यांकडून एकमेकांवर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, तसेच बीएमसी (BMC)कडून त्यांच्या बंगल्याच्या तपासणीसाठी आलेल्या नोटीसवर नारायण राणेंनी भाष्य केलं आहे. त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.

तुमच्या घराला बीएमसीची नोटीस आलीय असे अनेकांचे फोन आले माझी प्रतिक्रिया घेण्यासाठी. त्यामुळे सर्वांसमोर वास्तव सांगावं यासाठी तुमच्या समोर आलो आहे. या इमारतीचे आर्किटेक्ट हे तलाठी आहेत. देशात ज्यांचं नाव आहे. अशा आर्किटेक्टने ही इमारत बांधली. 1989 साली ही इमारत बांधण्यात आली. ओसी आणि तर परवानग्या महानगरपालिकेने दिलेल्या. या बांधकामानंतर एक इंचही बांधकाम मी केलं नाही. कारण काही आवश्यकताच नाही. या घरात माझी दोन मुलं त्यांच्या पत्नी, दोन लहान मुले अशी एकूण आठ जण आम्ही राहतो, असं त्यांनी सांगितलं.

या ठिकाणी हॉटेल किंवा कोणताही व्यवसाय चालत नाही. ही निवासी इमारत आहे. शंभर टक्के कायदेशीर इमारत असतानाही सेनेकडून, मातोश्रीकडून काही लोकांना सांगून या इमारतीविरोधात तक्रार करण्यात आली आहे, असं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

पालिका त्यांच्याकडे आहे. सातत्याने 2015 आणि 2016 मध्ये तक्रारी करण्यात आल्या. प्रत्येकवेळी महापालिकेचे सर्व प्लान बघितल्या गेले आणि काही इलिगल नाही असं पालिकेकडून सांगितलं गेलं. हा दुष्टपणा वारंवार केला गेला, असं राणेंनी सांगितलं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना काढली. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख मराठी माणसाच्या मुळावर आले आहेत. मी सैनिक म्हणणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुखच मुळावर आले, असाही नारायण राणेंनी केला आहे.

त्यांनी मातोश्री दुरुस्त केली. मातोश्री पार्ट टू तयार केली. आम्ही काय म्हणालो? मातोश्री पार्ट टूसाठी पैसे भरून इलिगल काम लिगल करून घेतलं. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत. पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही म्हणून गप्प आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या –  

“शिवसेना पक्षप्रमुखच मराठी माणसांच्या मुळावर उठलेत” 

राज्यातील ‘या’ भागात आज पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज 

काय सांगता! दारू आणि तंबाखू सेवनात महिला अव्वल, धक्कादायक आकडेवारी समोर 

 “सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण!