“उद्धव ठाकरे नामधारी मुख्यमंत्री, त्यांना बारामतीवरुन आदेश घ्यावा लागतो”

रत्नागिरी | कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारतात. उद्धव ठाकरे हे केवळ नामधारी मुख्यमंत्री आहेत, अशी कडवी टीका भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

रत्नागिरीत राणे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे यांना राज्याची काही माहिती नाही. त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं शरद पवार आणि जयंत पाटील देतात. असे मुख्यमंत्री महाराष्ट्राचा काय विकास करणार, असंही ते म्हणाले आहेत.

राज्याची निधी देण्याची क्षमताच उरलेली नाही. ते शहर विकासाला निधी उपलब्ध करुन देऊ शकत नाही. त्यातून मुख्यमंत्र्यांना काही निर्णय घ्यायचा असेल तर आधी बारामतीला जावं लागतं, असा टोला राणेंनी लगावला आहे.

ठाकरे यांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या पाढा मी स्वत: वाचेन, असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-