…म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही- नारायण राणे

 मुंबई : शिवसेना सोडताना मी बाळासाहेबांना 6 पानी पत्र लिहिलं होतं. यावर साहेबांनी मला फोन केला होता. नारायण रागावला का? एकदा परत ये. पण तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले राणे परत आले तर मी घर सोडीन. साहेब हे साहेब होते. प्रेम फक्त साहेबांवर केलं. उद्धव ठाकरेंनी अशी धमकी दिली होती. म्हणून मी बाळासाहेबांकडे परत गेलो नाही, असं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

नारायण राणे यांच्या ‘नो होल्डस् बार्ड’ या इंग्रजीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन मुंबईमध्ये करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विनोद तावडे हे उपस्थित होते. यावेळी नारायण राणे बोलत होते.

आम्ही पक्ष वाढवायला आणि पक्ष वाचवायला काम केलं. पण आता शिवसैनिक ते करू शकणार नाहीत. आता शिवसैनिक कमर्शियल झाले आहेत. आम्हाला तर त्यावेळी वडापावही मिळायचा नाही, असं नारायण राणेंनी सांगितलं आहे.

मी पुस्तक लिहिताना सावधगिरी बाळगली आहे. काही गोष्टी टाळल्या आहेत, असंही नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

मी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर पुस्तके लिहिण्याचाच संकल्प केला होता. पण काय करू परिस्थिती मला निवृत्त होऊ देत नाही. कणकवलीतील वरवडे गावचा एका गिरणी कामगाराचा मुलगा, ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तो या राज्याचा मुख्यमंत्री बनला. यातून तरुणांना काही तरी शिकायला मिळावे, प्रेरणा मिळावी यासाठी हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले, असं पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राणे बोलत होते.

महत्वाच्या बातम्या-

-कलम 370 मुद्द्यावर अकबरूद्दीन यांनी पाकिस्तानी पत्रकारांची केली बोलती बंद!

-अधिकारी असावा तर असा…! तहसीलदाराने पूरग्रस्तांसाठी डोक्यावर उचलल्या तांदळाच्या गोण्या

-काँग्रेस ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा कलम 370 ला विरोध पण ‘या’ कारणास्तव केली मोदींची स्तुती!

-मोदी सरकारचा वेडेपणा थांबणार तरी कधी??; राहुल गांधी भडकले

-सुनील तटकरेंना मोठा धक्का; ‘या’ कट्टर समर्थकानं केला शिवसेनेत प्रवेश