काँग्रेसच्या मार्गावर चाललो असतो तर देशाची प्रगतीच झाली नसती- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली | लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवेदन दिलं. यावेळी मोदींनी सरकारच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. तसेच त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

काँग्रेसच्या मार्गावर आम्ही आज चालत असतो, तर अनेक वर्षानंतरही ही प्रगती झाली नसती, असं म्हणत मोदींनी सडकून टीका केली आहे. काँग्रेसच्या विचारानं गेलो असतो तर देश बदलला नसता, असंही मोदी म्हणाले आहेत.

आमच्या सरकारमध्ये हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही देशासाठी अडचणीचे ठरणारे अनेक प्रश्न सोडवू शकलो. आमच्या सरकारने हिंमत दाखवून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं. काँग्रेसला हे कधीच जमलं नसतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

देशाला वेगाने प्रगतीपथावर नेण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. भाजप सरकारने पहिल्या पाच वर्षांच्या काळात अनेक विकास कामं राबवली. त्यामुळेच जनतेने आमच्यावर विश्वास दाखवत पुन्हा निवडून दिलं, असंही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आता स्वत:च्या कष्टाच्या पैशातून हेलिकॉप्टर घ्यायचं; रोहित पवारांनी व्यक्त केलं स्वप्न

-…पण जर माझा फोन टॅप झाला असेल तर हे अत्यंत दुर्दैवी- एकनाथ खडसे

-‘भाजप नेत्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय’; राष्ट्रवादीची बोचरी टीका

-…म्हणून दिली ठाकरे सरकारने वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटला 51 हेक्टर जमीन

-उद्धव ठाकरेेंच्या मंत्रिमंडळातील ‘या’ दोन मंत्र्यांच्या जीवाला धोका; केली सुरक्षा वाढवण्याची मागणी