दिल्ली बदलायची असेल तर आमच्या हातात सत्ता द्या- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलाय. प्रत्येक पक्ष आपापले मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीकरांना साद घालत दिल्ली बदलायची असेल तर आम आदमी पक्षाचं सरकार हटवा आणि आमच्या हातात सत्ता द्या. मग बघा विकासाचे वारे किती जोरात वाहतात, असं म्हटलं.

दिल्लीचं सरकार बेघर आणि गरिबांना घर देण्यास इच्छुक नाही. दिल्लीमधलं सरकार दिल्लीमध्ये पंतप्रधान आवास योजना लागू होऊ देत नाही. जोपर्यंत दिल्लीत हे आम आदमी पक्षाचं सरकार आहे तोपर्यंत जनेतेच्या हिताच्या केंद्राच्या योजना अडवण्याचं काम करणार… त्यापेक्षा तुम्ही हे सरकार बदला, असं मोदी म्हणाले.

भारतीय जनता पार्टी जे बोलते ते करते. भाजप नकारात्मकतेवर नाही तर सकारात्मकतेवर विश्वास ठेवते. देशासमोर मोठी आव्हान आहेत ती सोडवतोय दिल्लीतही बरेच मोठे प्रश्न आहेत तुम्ही सत्ता दिल्यास ते ही प्रश्न सोडव, अशा शब्दात मोदींनी दिल्लीकर नागरिकांना आश्वस्त केलं.

दरम्यान, मोदींच्या सभेआधी सभास्थळी ‘राष्ट्रवाद जिंकणार आणि शाहीनबाग हरणार’, अशा जोरदार घोषणा भाजप कार्यकर्त्यांनी दिल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांनी सामनाला दिलेली मुलाखत म्हणजे घरगुती आणि बालिश; राणेंची बोचरी टीका

-अरविंद केजरीवाल हे दहशतवादी आहेत… तसे पुरावे आमच्याकडे आहेत- प्रकाश जावडेकर

-“ह्या डांबर चोरात किती हिम्मत आहे ते आम्हाला माहीतय, कुठे यायचं सांगा फक्त”

-…तर देश तुम्हाला माफ करणार नाही; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

-“मनसेच्या त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी समर्थन द्यावं”